अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी शहरातील कोविड लसीकरणाबाबत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमांचे आणि अटींचे पालन होत नसल्याने कोरोना चा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील भागीरथी कन्या विद्यालय या एकाच ठिकाणी लसीकरण असल्याने वयोवृद्ध नागरिकांना या लसीकरण घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात तसेच गर्दीचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे आरोग्य व संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच आरोग्य विभागाकडून संपर्कासाठी देण्यात आलेला फोन हा कायमस्वरूपी बंद असल्याची तक्रारी असल्याने नगरपालिका हद्दीमध्ये प्रत्येक वार्डाच्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावी त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होऊन
त्या भागातील नागरिकांची लसीकरणासाठी सोय होईल आणि कोरोना चा प्रादुर्भाव देखील वाढणार नाही तरी या आरोग्य विभागाला करावेत अशा मागणी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कु-हे यांना पञाव्दारे केली आहे.
याचबरोबर मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात परिवर्तन आघाडीच्या वतीने देखील पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधी निवेदन दिले आहे.सदर निवेदनात म्हटले की, नगरपालिका हद्दीत सध्या सुरू असलेल्या नालेसफाईचे काम हे निकृष्ट दर्जाचा सुरू आहे त्यामुळे पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरून नुसकान होण्याची शक्यता आहे,
नालेसफाईच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी,नगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे कोरोना काळातील माफ करावे,लाॅकडाऊनमुळे नागरिकांची पाणीपट्टी घरपट्टी रद्द करावी, लॉकडाउन काळात शहरात कचरा नसतानादेखील ही ठेकेदारांना मोठी रक्कम अदा केल्याने त्याची चौकशी करावी,
कचरा वाहतूकीच्या गाड्या ठेकेदारास बेकायदेशीरपणे वापरण्यासाठी देण्यात आले आहेत रस्ता दुभाजकाला विरोध करताना विविध संघटनेने निवेदन दिले असताना देखील ही रस्ता दुभाजक केली गेली तर शहरातील स्ट्रीट लाईट तीन महिन्यापासून बंद असते
तर नगरपालिका अधिकाऱ्यांना न झालेल्या कामांची बिले करण्यासाठी दबाव टाकला जातो असा आरोप देखील यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे सदर निवेदनावर रावसाहेब यादवराव तनपुरे,शिवाजी सोनवणे, रावसाहेब राधुजी तनपुरे,शहाजी जाधव, सोन्याबापु जगधने, नमिता शेटे,
सुवर्णा खैरे, राखी तनपुरे,सिमा पवार,अक्षय तनपुरे, दिनकर मेहेत्रे, चंद्रकांत उंडे,भाऊसाहेब काकडे, अजित डावकर ,दीपक मेहेत्रे, प्रफुल्ल शेळके,अतिक बागवान, रोहिणी काळे, मंदाकिनी साळवे, नारायण धोंडगे,दिलीप राका,नयन शिंगी, दादासाहेब तोडमल,अरुण साळवे, चांगदेव भोंगळ आदींच्या सह्या आहेत.