ताज्या बातम्या

Optical Illusion : चित्रात लपला आहे साप; हिम्मत असेल तर 10 सेकंदात शोधून दाखवा…

Optical Illusion : आजकाल सोशल मीडियाचे (Social Media) युग आले. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. 

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

अनेक वेळा सोशल मीडियावर अशी चित्रे दिसतात ज्यात दृष्टीचा भ्रम असतो. म्हणजे असे काही चित्र ज्यामध्ये काही गोष्टी अगदी जवळून दडलेल्या असतात पण अनेकदा त्या आपल्या डोळ्यांना फसवून निघून जातात.

अलीकडच्या काही दिवसांत अशी अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्याबद्दल यूजर्स डोकं खाजवत राहतात. चित्राचे कोडे असो किंवा पेंटिंगमध्ये लपलेले काहीतरी असो, ऑप्टिकल भ्रम सोडवणे नेहमीच मजेदार असते.

ऑप्टिकल इल्युजनचे उद्दिष्ट तुमच्या समोर उभ्या असलेल्या चित्राद्वारे तुमची चाचणी घेणे आणि तुमच्या कौशल्यांची चाचणी घेणे आहे. यात तुमच्या डोळ्यांसमोरून गेलेले एक चित्र ज्यामध्ये झाडावर अनेक पोपट बसलेले आहेत आणि त्यात एक साप आहे जो तुम्हाला दिलेल्या वेळेत शोधावा असे आव्हान दिले आहे.

चित्रातील साप शोधणे फार कठीण मानले जाते. ठरलेल्या वेळेत साप शोधण्यात केवळ एक टक्का लोकांनाच यश आल्याचे मानले जात आहे. यावरून ऑप्टिकल भ्रम किती कठीण असतात याची कल्पना येते. गुलाबी चित्रात वायलेट पोपट झाडाच्या फांद्यावर बसलेले दाखवले आहेत. या चित्रात कुठेतरी साप लपलेला आहे पण तो ओळखणे सोपे नाही.

या चित्रात साप शोधण्यासाठी 10 सेकंद देण्यात आले आहेत. तथापि, बहुतेक वापरकर्ते आश्चर्यचकित झाले कारण त्यापैकी बहुतेकांना चित्रात लपलेला साप सापडला नाही. चित्रातील साप कुठे आहे ते तुम्हाला सांगत आहोत. चित्राच्या मध्यभागी डावीकडे जवळून पहा, तुम्हाला झाडाच्या पानांमध्ये एक हिरवा साप दिसेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts