Optical Illusion : आजकाल सोशल मीडियाचे (Social Media) युग आले. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
ऑप्टिकल भ्रमांचे अनेक प्रकार आहेत. काही तुमच्या मनाची परीक्षा घेतात तर काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. लोकांना दोन्ही प्रकारचे ऑप्टिकल भ्रम खूप आवडतात. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक सूर्यफूल वनस्पतींमध्ये कोल्हा, रॅकून, पक्षी आणि अस्वलाचे बाळ दिसतील. पण त्यात फुलपाखरू शोधावे लागेल.
20 सेकंदात फुलपाखरू शोधा
हे कोडे सोडवण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये २० सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. जर तुम्हाला दिलेल्या वेळेत फुलपाखरू सापडले तर तुम्ही खरोखरच हुशार आहात. हे काम दिसायला तितकंच सोपं असलं तरी ते करणं तितकंच अवघड आहे. त्यामुळे तो सोडवताना अनेकांच्या घामाच्या धारा लागल्या.
हिंट वापरा
जर तुम्हाला फोटोमध्ये फुलपाखरू दिसत नसेल तर फोटोच्या वरच्या डाव्या भागात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोकडे सतत लक्षपूर्वक पाहिल्यास तुमचे उत्तर दिसण्याची शक्यता वाढते. पण तरीही तुम्हाला हे कोडे सोडवता येत नाही, मग काही फरक पडत नाही, खालील फोटोमध्ये लपलेल्या फुलपाखराची स्थिती पहा…