ताज्या बातम्या

Big Breaking | सुप्रिम कोर्टातील सुनावणी अखेर लांबणीवर, तोपर्यंत हा आदेश

Big Breaking :महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाची ठरणारी सुप्रिम कोर्टातील याचिका आज अखेर लांबणीवर पडली. ही सुनावणी करण्यासाठी घटनापीठ नियुक्त करावे लागणार आहे.

त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत विघानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेशही कोर्टाने दिला आहेआज या याचिकांची सुनावणी होती.

ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे ही याचिका मांडली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आमदारांनी अपात्रतेच्या नोटिसा दिल्या आहेत. जर सुप्रिम कोर्टात उशीर झाला तर तिकडे निर्णय होऊ शकतो.

यावर कोर्टाने सांगितले की, ही वेळखाऊ बाब असल्यामुळे याचिकेवरील सुनावणीसाठी खंडपीठ त्वरित स्थापन करता येत नाही. ही प्रक्रिया होऊपर्यंत विधानसभा अध्यक्षांना कळवावे की, त्यांनी सध्या निर्णय घेऊ नये.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts