अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. युनायटेड किंग्डममध्ये असेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
जिथे एका महिलेने Apple iPhone 13 Pro Max विकत घेतला, परंतु त्या बदल्यात तिला 1 डॉलर किमतीचे हँड सॅनिटायझर मिळाले आहे. या आधीही अशा अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
रिपोर्ट्सनुसार, Khaoula Lafhaily नावाच्या महिलेने iPhone 13 Pro Max स्मार्टफोन खरेदी केला आहे. महिलेने हा फोन स्काय मोबाईल कॅरियरकडून १,५०० पौंड (अंदाजे १ लाख ५१ हजार रुपये) ३ वर्षांच्या करारावर खरेदी केला होता.
महिलेने आपला व्यवहारही पूर्ण केला, पण जेव्हा हे पॅकेज तिच्या हातात आले तेव्हा तिला ते पाहून धक्काच बसला महिलेला दोन दिवसांनी डिलिव्हरी केलेल्या पॅकेजमध्ये हँड सॅनिटायझर मिळाले. रिपोर्ट्सनुसार, तक्रार केल्यानंतरही महिलेला अद्याप तिचा आयफोन मिळालेला नाही.
Khaoula Lafhaily ने २४ जानेवारी रोजी iPhone 13 Pro Max विकत घेतला आणि एक दिवसाच्या डिलिव्हरीसाठी पैसेही दिले होते. तसेच, कंपनीने एका दिवसात डिव्हाइस वितरित केले नाही किंवा आयफोन 13 प्रो मॅक्स पॅकेजमध्ये आला नाही.
स्काय मोबाईलने सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. वृत्तानुसार, याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत कंपनीने संपर्क केला नव्हता. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
Iphone च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Apple iPhone 13 Pro Max ला ६.७ इंचाची सुपर रेटिना XDR स्क्रीन मिळते, जी Pro Motion सह येते. फोनच्या संरक्षणासाठी कंपनीने सिरॅमिक शील्डचा वापर केला आहे.
हँडसेट A15 बायोनिक चिपसेटवर काम करतो. Apple iPhone 13 Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 12MP वाइड अँगल, अल्ट्रा वाइड अँगल आणि टेलिफोटो लेन्स आहेत.
फ्रंटमध्ये कंपनीने 12MP ट्रू डेप्थ सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन iOS १५ वर काम करतो. यात मॅग सेफ चार्जिंग सपोर्ट आहे.