मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी भाजपच्या (Bjp) पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
दरेकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला (Police station) घेराव घालेल. पोलिसांची भाषा आरोपींना पाठीशी घालणारी आहे, असा इशारा दिला आहे.
तसेच असं सांगतानाच आमचा कोणावर संशय आहे हे राजश्री पलांडे (Rajshree Palande) यांनी थेट सांगितलंय. पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाली आहे. कुठल्यातरी गर्दुल्याला पकडणार किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार असं चालणार नाही, असे प्रवीण दरेकर बोलले आहेत.
त्याचसोबत दरेकर म्हणाले, आमच्या तक्रारीत प्रमुख संशयित आरोपी शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते असतील असा आरोप आम्ही आमच्या जबाबाबत केला आहे. आमच्या स्थानिक माजी नगरसेविका राजश्री पलांडे यांनी संशयितांची नावे दिली आहेत, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पोलखोल रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पालिकेत ३ लाख कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. तुमची पोलखोल मुंबईकरांसमोर मांडतोय. गुंड प्रवृत्तीकडून अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे.
शिवसेनेचा हात यात आहे की काय असा संशय आहे. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशन ला येऊन ठिय्या आंदोलन करणार, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.