PAN Card : तुमच्याकडे देखील पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 31 मार्चनंतर तुमचे देखील पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने पॅनकार्डधारकांना या प्रकरणात पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
31 मार्चपर्यंत ज्या लोकांचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसणार आहे त्यांचे पॅन कार्ड बंद करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच कार्ड आधारशी लिंक न करता तुम्ही 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 10 हजारांचा दंड बसू शकतो.
जर तुम्ही देखील आतापर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केला नसेल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या तुम्ही कोणत्या पद्धतीने पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकतात.
या सोप्या पद्धतीने पॅन कार्ड लिंक करा
तुम्ही घरबसल्याच पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.
आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
येथे तुम्ही आधार क्रमांकासह पॅन कार्ड लिंक करू शकता.
यानंतर तुम्हाला तुमची माहिती टाकावी लागेल.
जसे स्वतःचे नाव आणि जन्मतारीख.
जर तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त 1985 ही जन्मतारीख लिहिली असेल तर बॉक्सवर उजवीकडे खूण करा.
verify करण्यासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
यानंतर तुम्हाला “Link Aadhaar” लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.