Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीचा जोर वाढला असल्याने राज्यात शेती कामाला मोठा वेग आला आहे. राज्यात सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची काढणी करत असून रब्बी हंगामातील पीक पेरणीला देखील मोठा वेग येत आहे.
रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी बांधव शेतशिवारात लगबग करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामानदाचानुसार, राज्यात आता हवामान कोरडं राहणार आहे.
दिवसा कडक सूर्यदर्शन आणि रात्री तीव्र थंडी जाणवणार आहे. मात्र असे असले तरी, त्यापासून राज्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाबराव डख यांच्या मते, उद्यापासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
उद्या दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाचे वातावरण राहणार असले तरी देखील राज्यात पाऊस पडणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. निश्चितच राज्यात सध्या हवामान कोरडे आहे आणि यामुळे राज्यात शेती कामाला मोठा वेग आला आहे.
जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी आता रब्बी हंगामातील पिकप पेरणीसाठी सज्ज झालं पाहिजे. पंजाबराव डख यांनी देखील शेतकरी बांधवांना गहू आणि हरभरा पिक पेरणीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्यात गहू आणि हरभरा या दोन पिकाची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
या परिस्थितीत पंजाबराव डख यांनी हरभरा पेरणी करणारा शेतकरी बांधवांना 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या काळात पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पंजाबराव यांच्या मते या काळात हरभरा पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना अधिक उतारा मिळणार आहे परिणामी त्यांच्या उत्पादनात वाढ आणि उत्पन्नात देखील भर पडणार आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी आजपासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत बागायती क्षेत्रात वेळेवर गहू पेरणी केली पाहिजे.