ताज्या बातम्या

Panjabrao Dakh : ब्रेकिंग ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ; शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ‘या’ दिवशी पुन्हा कोसळणार पाऊस ; वाचा सविस्तर

Panjabrao Dakh : राज्यात कालपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

दरम्यान राज्यात परतीच्या पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीपासून शेतकरी बांधवांनी कसेबसे आपली पिके वाजवली मात्र खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसामुळे (Monsoon News) पिकांची मोठे नासाडी झाली आहे.

दरम्यान दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. भारतीय हवामान विभागाने देखील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज सार्वजनिक केला आहे. तसेच आता महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यामुळे निश्चितच शेती कामाला वेग येणार असून शेतकरी बांधव आता खरीप हंगामातील पिकांची काढणी करणार असून लवकरच रब्बी हंगामातील पिक पेरणीसाठी सज्ज होणार आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

मित्रांनो पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आता पाच दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या दरम्यान खरीप हंगामातील पिकांची काढणी करून घ्यावी असा सल्ला पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

सध्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव खरीप हंगामातील सोयाबीन तसेच मका या पिकाची काढणी करत असल्याचे चित्र आहे. यामुळे आता पावसाची उघडीप झाली असल्याने शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हार्वेस्टिंगची कामे पुर्ण करून घ्‍यावीत. सध्या पावसाची उघडीप असली तरीदेखील या महिन्याच्या शेवटी पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे.

पंजाबराव डख यांच्या मते या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेच्या आसपास राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळू शकतो. निश्चितच त्यामुळे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रब्बी हंगामाच्या पेरणीची आणि खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण करावी लागणार आहे.

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी पावसाळी काळात चांगला मुबलक पाऊस झाला असल्याने तसेच परतीच्या पावसामुळे देखील राज्यातील प्रमुख धरणे, विहिरी, नदीनाले तुडुंब भरले असल्याने रब्बी हंगामासाठी तसेच उन्हाळी हंगामासाठी पाण्याचा ताण बसणार नाही. यामुळे निश्चितच रब्बी हंगामासाठी आणि उन्हाळी हंगामासाठी पोषक परिस्थिती बनत असल्याचे चित्र आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts