ताज्या बातम्या

पाहुण्यांच्यासमोर देशभक्तीपर घोषणा, पाठ फिरताच आयटम साँन्गवर डान्स, स्वातंत्र्यदिनी हे काय घडलं?

Maharashtra News : देशभरात स्वातंत्र्य दिनाची ७५ वर्ष जल्लोषात साजरा होत असताना पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

१५ ऑगस्टला उत्तर प्रदेशातील आआयटी (बीएचयु) येथे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. पण त्यानंतर पाहुणे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट आयटम साँन्गवर डान्स सुरू केला.

ज्यांनी ‘मा तुझे सलाम’वर घोषणा दिल्या होत्या त्यांनी नंतर भोजपुरी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरला. हा प्रकार सुरू असताना तेथे उपस्थित असलेल्या प्रध्यापक आणि अन्य लोकांनी याला विरोध केला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी संस्थेचे डायरेक्टर प्रमोद कुमार यांनी संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा आदेश दिला. आता यासंबंधी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts