ताज्या बातम्या

“पवार साहेब ही काळाची गरज, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं”

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्यानंतर अनेक नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत.

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्वपूर्ण विधान केले आहे. पवार साहेब आज मुख्यमंत्री (CM) असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही असे विधान यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यावेळी शरद पवार हेही उपस्थित होते.

शरद पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच शरद पवार यांनी अमरावतीत बोलताना भाजपवर (BJP) निशाणा साधल्याचे दिसत आहे. शरद पवार म्हणाले, काश्मीरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. आता एका चित्रपटात हिंदूंवर अत्याचार कसा होतो हे दाखवले.

काश्मीर फाईल चित्रपट बघीतला पाहिजे असं आवाहन केंद्र सरकरने केलं. तेव्हा देशात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होतं त्याला भाजपचा पांठिबा होता. याला भाजप जबाबदार आहे. हे देशाच्या एकतेला सुरुंग लावण्याचं काम आहे.

याविरोधात लोकांनी एकत्र यायला हवं. जातीयवाद, धर्मांच्या नावावर राजकारण करतात अशांच्या विरोधात उभं राहयचंय, असेही पवार म्हणाले. तसेच महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वत्र महागाई वाढते.

देशात बेरोजगारी आहे. सरकार देशाच्या समोरच्या प्रश्नाला सहकार्य करत नाही. तसेच कुणी राज्या-राज्यात संघर्ष निर्माण करत असेल तर एकत्र यायला हवं असेहि पवार म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts