Paying Bank Cheque : शक्यतो अनेक जण ऑनलाईन पेमेंट (Online payment) करतात. परंतु, काही वेळेस अनेकजण चेकचा (Bank Cheque) वापर करतात.
चेकने पैसे (Pay by check) भरत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्यात. नाहीतर तुम्हाला तुरुंगात (Jail) जावे लागेल. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात.
चेकने पैसे भरताना काळजी घ्या
चेकद्वारे पेमेंट करतानाही तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. जर तुमच्या चेकमध्ये काही चूक झाली तर तुमचा चेकही बाऊन्स (Check bounce) होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल.
तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो आणि तुरुंगवासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमचा चेक ज्या कारणांमुळे बाऊन्स होऊ शकतो त्या कारणांची जाणीव असणे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
या कारणांमुळे चेक बाऊन्स होऊ शकतो
चेक बाऊन्स होण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यातील शिल्लक कमी असेल किंवा नसेल, तर अशा परिस्थितीत चेकही बाऊन्स होऊ शकतो. याशिवाय स्वाक्षरी बदलणे, शब्द लिहिण्यात चूक होणे, खाते क्रमांक लिहिण्यात चूक होणे, ओव्हरराईट करणे यासारख्या समस्यांमुळेही चेक रद्द होऊ शकतो.
या व्यतिरिक्त, कालमर्यादा संपल्याने, चेकर्सचे खाते बंद होणे, बनावट चेकचा संशय, चेकवर कंपनीचा शिक्का नसणे आणि ओव्हरड्राफ्ट मर्यादा ओलांडल्यामुळे चेक बाउन्स होऊ शकतात.
चेक बाऊन्स झाल्यास ही कारवाई केली जाऊ शकते
चेक बाऊन्स झाल्यावर बँका (Bank) त्यांच्या ग्राहकांकडून दंड वसूल करतात. हा दंड कारणांनुसार बदलू शकतो. दंडाची रक्कम 150 ते 750 किंवा 800 रुपयांपर्यंत असू शकते. चेक बाऊन्स हा गुन्हा मानला जातो.
तसेच चेक बाऊन्स झाल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. त्याला एकतर कारावासाची शिक्षा दिली जाईल किंवा चेकमध्ये जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट दंड वाढू शकेल.