Shukra Gochar : देशात आजही ज्योतिषशास्त्रानुसार शुभकार्य करणारे अनेकजण आहेत. तसेच दररोज ज्योतिषशास्त्रानुसार राशिभविष्य जाहीर केले जाते. अनेकांच्या राशीमध्ये शुभ योग्य असतो तर अनेकांच्या राशीमध्ये अशुभ योग्य असतो. अनेकजण राशिभविष्यावरही विश्वास ठेवत असतात.
ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा राक्षस आणि सुख-समृद्धीचा कारक मानला गेला जातो. दुसरीकडे, शनीला न्यायाची देवता मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार नुकतेच २९ डिसेंबरला शुक्राने मकर राशीत प्रवेश केला आहे.
शुक्र आणि शनीची युती होणार असल्याने अनेक राशीवर सकारात्मक आणि अनेक राशीवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे येणार काळ काहींना लाभदायक आहे तर काहींना त्रासदायक ठरणार आहे.
शुक्र-शनि युती या राशींवर त्याचा प्रभाव दाखवेल
कन्या
शनि आणि शुक्राच्या युतीने कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस आले आहेत. आतापर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता त्यांना या सर्वांपासून मुक्ती मिळणार आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्यातूनही नफा मिळू लागेल. प्रदीर्घ काळ केलेल्या प्रयत्नांचेही सुखद परिणाम मिळणार आहेत.
मकर
शुक्र आणि शनीची ही युती मकर राशीतच तयार होत आहे. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही कर्ज घेतले असेल तर तेही फेडण्याची वेळ आली आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या आता दूर होतील आणि कौटुंबिक जीवन देखील चांगले राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि आणि शुक्र यांची परस्पर युती खूप शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसलेल्या त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यांचे उत्पन्नही खूप वाढेल. त्यांच्या सन्मान आणि संपत्तीतही प्रचंड वाढ दिसून येईल.