ताज्या बातम्या

Diabetes patients : मधुमेह असणाऱ्यांनी आवर्जून खावीत ‘ही’ पाने, नियंत्रणात राहते साखरेची पातळी

Diabetes patients : अनेकजणांना मधुमेह असतो. मधुमेह शक्यतो बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होतो. जर या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आली नाही, तर भविष्यात खूप मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

अनेकांचा मधुमेह नियंत्रणात येत नाही परंतु, तुम्ही काही घरगुती उपाय करून रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळू शकता.ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

नाहीतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि तुमचे आरोग्य धोक्यात येते. जर या रुग्णांनी काही पाने खाल्ली तर त्यांची साखर नियंत्रणात येऊ शकते.

कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग

कढीपत्ता शक्यतो पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरले जाते. जर मधुमेही रुग्णांनी कढीपत्ता खाल्ला तर त्यांची साखर नियंत्रणात येऊ शकते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे.

आंब्याच्या पानांचा उपयोग

ठराविक काळात आंबा असतो, परंतु, त्याची पाने कधीही आणि कुठेही मिळतात. आंब्याच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी फायबर आणि पेक्टिन साखर नियंत्रित ठेवते. तुम्ही ही पाने चावून खाऊ शकता किंवा पाण्यात उकळून गाळून खाऊ शकता.

कडुलिंबाच्या पानांचा उपयोग

कडुलिंबाच्या पाने कडू असली तरी त्यात आयुर्वेदिक औषधी असतो. ही पाने फक्त तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नाही तर त्वचेच्या आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देतात.

मेथीच्या पानांचा उपयोग

मेथीच्या पानांचे पराठे बनवून किंवा पाने आणि दाणे चघळल्यानेही साखरेची पातळी प्रमाणात कमी करण्यात येते. त्याचबरोबर रोज सकाळी भिजवलेल्या मेथीचे सेवन केले तरीही त्याचा तुम्हाला फायदा होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts