ताज्या बातम्या

Coffee and Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी कॉफीपासून रहावे चार हात लांब, नाहीतर…

Coffee and Cholesterol : धावपळीच्या जगामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अनेकांना तर कॉफीची सवय इतकी असते की ते दिवसातून कितीतरी वेळा कॉफी घेतात.

परंतु, जास्त कॉफी पिल्याने याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशातच उच्च कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांनी कॉफी घेणे टाळावे नाहीतर त्यांना कॉफी पिणे खूप महागात पडू शकते. कॉफी पिल्याने त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते.

कसे आहे कॉफी आणि कोलेस्टेरॉलचे कनेक्शन

कॉफीच्या सेवनाने शरीरातील सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. परंतु, तुम्ही किती प्रमाणात कॉफी पिता यावर ते अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉफी महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. यावर 2016 मध्ये एक संशोधन झाले आहे. त्यानुसार कॉफीचे जास्त सेवन केले तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कॉफी बीन्समध्ये आढळणारे जलद कोलेस्टेरॉल पातळी वाढवण्यास कारणीभूत आहे.

कोणती कॉफी आहे घातक

कॉफीत असणाऱ्या डायटरपीनमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते. 2011 च्या अभ्यासानुसार, फ्रेंच प्रेस कॉफी, तुर्की कॉफी कमी प्रमाणात खावी. या कॉफीचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर सर्वात जास्त परिणाम होतो. तसेच एस्प्रेसो, फिल्टर कॉफी आणि इन्स्टंट कॉफीमध्ये डायटरपीन फार कमी प्रमाणात असते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत फारसा फरक पडत नाही.

अशाप्रकारे करा कोलेस्टेरॉलची पातळी कमी

  • निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा.
  • रोज 30-45 मिनिटे व्यायाम करा.
  • जास्तवेळ बसणे टाळा.
  • निरोगी आणि पौष्टिक अन्न खा.
  • जास्त कॉफी पिऊ नका.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts