अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, या खराब रस्त्यामुळे अनेक प्रवासी, वाहनचालक या रस्त्याने प्रवास करणे देखील टाळत आहेत.
या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून मिरी तिसगाव या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या खराब रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात देखील झाले आहेत.
या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा रस्ता नेमका कधी दुरुस्त होणार असा प्रश्न आता प्रवाशांसह सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
खराब रस्त्यामुळे अनेक वाहनचालकांनी या रस्त्याने प्रवास करणे देखील टाळले आहे. वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात या खराब रस्त्यामुळे नुकसान होत आहे. अनेक प्रवासी मांडवा राघूहिवरे या रस्त्याने प्रवास करणे पसंत करत आहेत.
अनेकांनी लक्ष वेधून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे डोळेझाक करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.