ताज्या बातम्या

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर झाले अपडेट, जाणून घ्या आजचे नवीनतम तेल दर एका क्लीकवर…..

Petrol-Diesel Price Today: इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) नेहमीप्रमाणे आज (सोमवार), 25 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) जाहीर केले आहेत. राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

तर गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण (Fall in crude oil prices) झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आहे.

दरम्यान इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते चेन्नई या देशातील सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

जाणून घ्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर –
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत…

  • दिल्ली
    पेट्रोल 96.72 , डिझेल 89.62
  • मुंबई
    पेट्रोल 106.31, डिझेल 94.27
  • चेन्नई
    पेट्रोल 102.63, डिझेल 94.24
  • कोलकाता
    पेट्रोल 106.03, डिझेल 92.76

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित असतात. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरही वेगवेगळे आहेत. भारतातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे दररोज जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts