Petrol Price Today : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल २ दिवसाच्या वाढीनंतर आज त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज पेट्रोल डिझेल (Disel) चे दर स्थिर आहेत. कच्चा तेलाच्या (Crud Oil) किमती मुळे पेट्रोल डिझेलचे भाव कमी जास्त होत आहेत.
यापूर्वी मंगळवार आणि बुधवारी त्यांच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ झाली होती. अशाप्रकारे दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १.६० रुपयांनी वाढ झाली आहे.
अशाप्रकारे, दिल्लीत (Delhi) आज डिझेलची किंमत 88.27 रुपये प्रति लीटर आहे आणि पेट्रोल 97.01 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 111.67 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 95.85 रुपये दराने विकले जात आहे.
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 78.52 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी भापाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे.
देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 113.87 रुपये आणि डिझेलची किंमत 96.91 रुपये आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली पेट्रोल 97.01 रुपये आणि डिझेल 88.27 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.67 रुपये आणि डिझेल 95.85 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.34 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.91 रुपये आणि डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
खरे तर रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान (War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती.
त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात.
इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.