Petrol Rate Today : देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलत असतात. सरकारी तेल कंपन्या सकाळी 6 वाजता नवीनतम दर जाहीर करत असतात. दरम्यान आजही सरकारी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे.
आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामुळे तर तुम्ही जाणून घ्या पेट्रोल पंपावर जात असाल तर तुमच्या शहरातील नवीन दर.
जाणून घ्या देशातील शहरांमधील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
सध्या दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई येथे पेट्रोल 106/31 रुपये तसेच डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर दुसरीकडे, चेन्नई येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
या ठिकाणी मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल
राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर तसेच डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
पहा आजचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
ही आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 71.61 डॉलरपर्यंत घसरले असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 75.32 डॉलरवर गेले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झाली नाही.
उत्पादन शुल्कात कपात
केंद्र सरकारकडून यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली. त्यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली.