ताज्या बातम्या

PF Account : आनंदाची बातमी! उद्या होणार महत्त्वाचा निर्णय, खात्यात येणार पैसे

PF Account : सर्व नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून नोकरदार वर्ग पीएफ व्याजाच्या रकमेची वाट पाहत आहेत. त्यांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण सरकार उद्या एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

सरकार आता EPFO व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे साहजिकच नोकरदारांच्या खात्यात जास्त पैसे येणार आहेत. आजपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची बैठक सुरु असून ती दोन दिवस असणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.

मिळत आहे 8.1 टक्के व्याज

मार्च 2022 मध्ये, EPFO ​​ने 2021-22 साठी त्याच्या जवळपास पाच कोटी भागधारकांच्या EPF वर मिळणारे व्याजदर हे चार दशकांहून अधिक कमी 8.1 टक्क्यांवर आणला होता. हा व्याजदर 1977-78 पासून सर्वात कमी होता. मात्र हा व्याजदर 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता.

होणार बैठक

2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदरावर निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था लवकरच बैठक घेणार आहे असे एका सूत्राने सांगितले आहे.

उपलब्ध आहे जास्त पेन्शनची सुविधा

या बैठकीत सुप्रीम कोर्टाने जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्याच्या आदेशावर ईपीएफओने काय कारवाई केली आहे, यावरही चर्चा होऊ शकते. EPFO कडून आपल्या भागधारकांना 3 मे 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

व्याजदर आहे 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर

मार्च 2020 मध्ये ईपीएफओकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांच्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात आला होता. 2018-19 साठी तो 8.65 टक्के होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts