अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी कडुनिंबांचे वृक्ष वाळुन जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी हुमनी किटकांच्या भुंगेर्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसुन येत आहे. कीड रोग नाशक म्हणून वापर करण्यात येणाऱ्या कडुलिंबावरच एका किडीने हल्ला केला आहे.
एक प्रकारच्या हुमणीच्या जीवन साखळीतील हे भुंगेरे कडुलिंबाचा पाला खात असल्याने झाड वाळून जात असल्याचे प्रकार आढळून आले आहेत. निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाने निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.
हुमणीच्या भुंगेर्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढले आहे. त्याचा प्रादुर्भाव कडुलिंब वृक्षांवर दिसून आला. ठिकठिकाणी कडुलिंबांचे वृक्ष वाळून जात आहेत. हुमणी ही शेती फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी अळी आहे.
देशात हुमणीच्या सुमारे ३०० प्रजाती असून त्यातील लिकोफोलिस आणि होलोट्रॅकिया अशा दोन प्रजाती आपल्याकडे आढळतात. हुमणीची जीवनसाखळी अंडी, अळी, कोष व कीटक या अवस्थांमधून पूर्ण होते. अळी अवस्थेत असताना हुमणी जमिनीत राहून पिकांची मुळे खातो.
जून-जुलै मध्ये त्याचे किटकात रुपांतर झाल्यावर भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. ते थव्याने कडुलिंब व बाभूळ या झाडांवर रात्री हल्ला करतात. हे भुंगेरे सुमारे शंभर दिवस जगतात. यावर्षी त्यांचे प्रमाण अधिक असल्याने जादा नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
वातावरणातील व नैसर्गिक अन्नसाखळ्यांच्या असमतोलामुळे हुमणीच्या किटकांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसुन येत आहे.
हुमनी हा शेती फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी किटक असुन यांची वाढती संख्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याची माहिती वनस्पती अभ्यासक प्रतिम ढगे यांनी दिली.