पिचड म्हणाले…राजकारणात चढ-उतार सुरू असतात

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह त्यांचे समर्थक आज मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना माजी आमदार वैभव पिचड यांनी म्हटले आहे, की राजकारणात चढ-उतार सुरू असतात.

या गोष्टींना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कधीही जास्त महत्त्व दिले नाही. मीही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय. अकोले तालुक्‍यातील हालचालींमुळे कोणीही विचलित होऊ नये.

मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून, आणखी ताकदीने उभे राहण्याचा संकल्प कार्यकर्ते, मित्रांनी करावा,’ असे आवाहन पिचड यांनी केले आहे.

अकोले तालुक्‍यातील राजकीय बदलामुळे तरुणांना सुवर्णसंधी आहे. कुठलाही नेता फक्त जिवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो.

या बदलांमुळे मी खचलोय, असा विचार मनात आणू नका. आपले कार्य पूर्ण ताकदीने सुरू ठेवा. मी खंबीरपणे आपल्यासोबत असल्याचे पिचड यांनी नमूद केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts