अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : सध्या शेतकरी शेतामध्ये उत्पादन वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. पण पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांचे संरक्षण होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आपली पिकांची मुळे समस्या आहे कीटक व बुरशी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बहुपीक पद्धत प्रभावी ठरत आहे. शेतातील कीटक व बुरशी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य पिकांच्या सभोवताली सापळा पध्दतीने पिकाची लागवड केल्यास पिकाचं किडीपासून होणार नुकसान टाळता येऊ शकणार आहे.
सापळा पिकांची लागवड करताना मुख्य पिकां बरोबर त्याची स्पर्धा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यात अंतर पिकाला पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश निट मिळत आहे का याचा निट अभ्यास करूनच पिकांची लागवड करावी.
सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, हे पिक मुख्य पिकां भोवती एखाद्या घराला सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तसेच ही अंतर पिके मुख्य पिकांभोवती संरक्षक म्हणून काम करतात.
सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. या अंतर पिकांमध्ये झेंडू, वेलवर्गीय, टोमॅटो, कांदा,भुईमूग इत्यादी पिकांची लागवड करता येऊ शकते.
तर झेंडूची लागवड आंतर पिक म्हणून केल्यास झेंडूच्या विशिष्ट सुगंधाने मावा, रसशोषक कीड पळवुन लावून मातीमधील निमॅटोड्स नष्ट करतो.
तर गाजराची लागवड केल्यास गाजराची फुले मोठया प्रमाणात मधमाश्या, परोपजिवी व भक्षक किडींना आकर्षित करतात.
त्यामुळे भक्षक किडी टिकून राहतात. लेट्युस रोगनाशक आहे. म्हणून रोगापासून पिकांचे बचाव होतो. उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते.
तर कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये मोहरी ची पीक घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्याच्या पतंग या किडीची तीव्रता कमी करू शकतो.