PM Kisan : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना.
या योजनेअंतर्गत (PM Kisan Mandhan Yojana) सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला 3000 रुपये जमा करते. मात्र या योजनेसाठी केवळ काही शेतकरी पात्र असतात.
या योजनेत शेतकऱ्यांना पेन्शन मिळते
वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) नावाची योजना राबवत आहे. http://maandhan.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत (PM Kisan Mandhan), 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांना शासनाकडून 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये मासिक पेन्शन दिले जाते.
अर्ज कसा करता येईल
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला http://maandhan.in वेबसाइटवर जावे लागेल आणि क्लिक हेअर टू अप्लाय बार्बर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला सेल्फ एनरोलमेंटचा पर्याय निवडावा लागेल.
दुसऱ्या चरणात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि ई-मेल आयडी टाकून आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून एक OTP जनरेट करावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल, तुम्हाला तो टाकावा लागेल.
ओटीपी भरल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्या नवीन पेजवर तुम्हाला एनरोलमेंटच्या पर्यायावर ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
त्या फॉर्ममध्ये तुम्हाला मागितलेली सर्व माहिती टाकावी लागेल आणि घोषणेशी सहमत झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.