PM Kisan : केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. ज्याचा फायदा नागरिकांना होतो. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना होय. देशभरातील लाखो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.
केंद्र सरकडून या योजनेचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला होता. अशातच आता या योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या महिन्यात येईल हप्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा पुढील हप्ता मे अखेरीस येईल. काही अहवालांनुसार, सरकार आगामी हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही खात्यात 26 मे ते 31 मे दरम्यान ट्रान्सफर करेल. परंतु अजूनही याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
या योजनेचा शेवटचा हप्ता म्हणजेच 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. दरम्यान या योजनेंतर्गत आता पुढील हप्ता मे किंवा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ई-केवायसी अनिवार्य
सध्या राज्य सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याची विनंती करत असून याबाबत बिहार सरकारच्या कृषी विभागाकडून ट्विट करण्यात आले आहे 14 व्या हप्त्यापूर्वी ई-केवायसी पडताळणी करावी.
या दोन पद्धतीने करा ई केवायसी
तुम्ही हे काम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरी बसून ऑनलाइन करू शकता तसेच तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट देऊन हे काम पूर्ण करू शकता. जर तुम्ही स्वत: OTP द्वारे ई-केवायसी केल्यास तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही परंतु जर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी केल्यास त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागणार आहेत.
असे करा पैसे परत
समजा तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे चुकून मिळाले असल्यास किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसल्यास तर तुम्ही, ऑनलाइन पैसे परत करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की तुम्ही फक्त pmkisan.gov.in पोर्टलद्वारे, पीएम किसान निधी योजनेचे पैसे परत करू शकता.
हे आहेत पात्र शेतकरी