अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Government Scheme : पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा (Government Scheme) मध्यंतरी अनेक बोगस शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याने या योजनेसाठी पात्र शेतकर्यांना केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अनुषंगाने शेतकरी बांधवांना (Farmers) केवायसी करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते केंद्र शासनाने (Modi Government) ही बाब लक्षात घेऊन या योजनेसाठी आवश्यक केवायसी करण्यासाठी शासनाने मुदतवाढ (Extension For e-KYC) दिली होती.
केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत असलेली मुदत आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. असे असले तरी 31 मे पर्यंत योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे.
यादरम्यान केंद्र सरकारने आता केवायसी करण्यासाठी असलेल्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. आता, काही काळ या योजनेसाठी मोबाईल द्वारे केली जाणारी केवायसी स्थगित केली केली आहे.
याचाच अर्थ आता शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर अर्थात आपले सेवा केंद्र गाठावे लागत आहे. मात्र, सीएससी सेंटर वर पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट दिवसा बंद असते आणि रात्रीच केवायसी या पोर्टलवर होत आहे. यामुळे केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या या योजनेसाठी केवायसी करण्याकरता ओटीपी चा पर्याय बंद केला गेला आहे आणि बायोमेट्रिक पद्धतीने आता केवायसी केली जात आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना सीएससी सेंटरला हेलपाट्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे सीएससी सेंटर वर शेतकऱ्यांना रात्रभर बसून राहावे लागत आहे कारण की पोर्टलची अधिकृत साईट दिवसा बंद असते.
विशेष म्हणजे केवायसी करताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे याची पडताळणी होत नाही याशिवाय बँक खात्याची पडताळणी देखील केली जात नाही तसेच बँक बदलाचा पर्याय देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला नाही.
यामुळे केवायसी का? असा प्रश्न आता शेतकरी राजा उपस्थित करीत आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्यामध्ये मतभेद असल्याने महसूल विभागाने या कामावर बंदी घातली असून आता या योजनेची नव्याने नोंदणी देखील होत नाहीये. एवढेच नाही केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर चालक शेतकऱ्यांकडून मनमानीपने रक्कम वसूल करीत आहेत.