PM Kisan Scheme : राज्यातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून (Central Govt) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येतात.
ही रक्कम 2 हजार रुपयांच्या 3 हफ्त्यांमध्ये देण्यात येते. परंतु, अनेकांना वेटिंग फॉर अप्रूवलचा (Waiting for approval) मेसेज येत आहे.
वेटिंग फॉर अप्रूवलचा अर्थ काय आहे
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणारा हप्ता राज्यांनीही मंजूर केला आहे. जर तुमच्या राज्य सरकारने (State Govt) आगामी 12 व्या हप्त्याला (12th installment) मंजुरी दिली नसेल, तर तुमच्या मोबाईलवर राज्याच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचा संदेश येईल.
याशिवाय तुमच्या मोबाईलवर रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफरचा (Request for Transfer) मेसेज आला असेल, तर याचा अर्थ राज्य सरकारने लाभार्थीची माहिती तपासली आहे, जी बरोबर आढळून आली आहे आणि तशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केली होती.
हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवले जावेत. जर तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशनचा मेसेज लिहिलेला दिसला, तर याचा अर्थ फंड ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू झाली आहे. हप्ता जारी होताच, काही दिवसात रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
अशा प्रकारे तुम्ही पीएम किसानची स्थिती तपासू शकता
पीएम किसानच्या हप्त्याची (Installments of PM Kisan) स्थिती पाहण्यासाठी प्रथम pmkisan.gov.in वर जा. त्यानंतर वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. स्थिती तपासण्यासाठी, आधार क्रमांक, मोबाइल नंबर यासारखे तपशील प्रविष्ट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.