ताज्या बातम्या

PM Kisan Yojana : ‘या’ कारणामुळे 12व्या हप्त्याला उशीर होत आहे, वाचा सविस्तर

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) होय. या योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत.

त्यामुळे शेतकरी 12व्या हप्त्याची (12th installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, हा हप्ता येण्यास काहीसा उशीर झाला (PM Kisan Samman Nidhi Yojana) आहे.

12वा हप्ता मिळण्यास उशीर का होतोय?

वास्तविक, हप्ता येण्यास उशीर होण्यामागचे पहिले कारण म्हणजे सरकार (Govt) बनावट लाभार्थी ओळखत असल्याचे मानले जाते. अशा शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले जात आहेत.

त्याचवेळी, हप्त्याला उशीर होण्याचे दुसरे कारण म्हणजे भुलेख पडताळणी हे असल्याचे मानले जात आहे. कारण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची भुलेख पडताळणी केली जात आहे.

हप्त्याला उशीर होण्याचे तिसरे कारण म्हणजे ई-केवायसी. याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 होती आणि आता ती संपली आहे. तथापि, पोर्टलवर OTP आधारित KYC अजूनही उपलब्ध आहे.

हप्ता कधी येऊ शकतो?

पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत 11 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता प्रत्येकजण 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही दिवशी जारी केला जाऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts