PM Kisan Yojana : आपल्या देशात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची (farmers) संख्या अजूनही खूप जास्त आहे.
शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून पीक घेतो, मात्र अनेकवेळा शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येते.
हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी देशात अनेक योजना राबवल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) .
ही योजना केंद्र सरकार (central government) राबवत असून, पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात.
आतापर्यंत 11 हप्ते जाहीर झाले असून आता सर्व लाभार्थी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील की नाही हे कळू शकेल.
स्थितीचा अर्थ काय आहे?
प्रथम स्थिती जेव्हा तुम्ही ऑनलाइन स्थिती तपासाल तेव्हा तुम्हाला येथे तीन टाईपचे स्टेटस दिसणार. यातील पहिला म्हणजे ‘वेटिंग फॉर अप्रूवल बाय स्टेट’, म्हणजेच राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
दुसरी स्थिती दुसरी स्थिती ‘रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर’ आहे, याचा अर्थ शेतकऱ्यांचा डेटा राज्याने तपासला आहे आणि केंद्राला पैसे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
तिसरी स्थिती तिसरी स्थिती ‘FTO जनरेट आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित आहे’. या स्थितीचा अर्थ असा आहे की पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता हप्त्याचे पैसे काही दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती याप्रमाणे तपासू शकतात
स्टेप 1 तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 2 आता ‘लाभार्थी स्थिती’ वर क्लिक करा यानंतर, तुम्हाला नोंदणी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक निवडावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोडच्या पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3 आता जनरेट OTP वर क्लिक करा यानंतर तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल.