PM Kisan Yojana : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या (Kisan Yojana) 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
आज या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार (12th installment of PM Kisan Samman Nidhi) आहे. करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात आज 12 व्या हप्त्याचे (12th installment) पैसे जमा होणार आहेत.
पंतप्रधान आज नवी दिल्लीत सकाळी 11.30 वाजता ‘पीएम किसान सन्मान संमेलन 2022’ चे उद्घाटन करतील आणि या परिषदेदरम्यान (PM Kisan Samman Sammelan 2022) पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी करतील.
यावेळी 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जारी केला जाईल. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळाला आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत. जुलैमध्ये 11व्या हप्त्याची रक्कम 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. केंद्र सरकारने (Central Govt) दिलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादी तपशील भरले जातात.
शेतकऱ्याचे बँक खाते व इतर माहिती कृषी विभागात दिली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षातून तीनदा (4 महिन्यांतून एकदा) 2 हजार रुपये येतात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.
ई-केवायसीशिवाय (E-KYC) पैसे खात्यात जमा होणार नाहीत. 12व्या हप्त्याबाबत तुमच्या मनात काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास, तुम्ही PM किसान योजना हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर मेल करू शकता.