PM Kisan Yojana 11th Installment : PM मोदींनी 11 व्या हप्त्यातील 21 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हस्तांतरित केले.
PM Kisan Yojana Helpline Number : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) अंतर्गत मिळणाऱ्या 11व्या हप्त्यातील 21 हजार कोटी रुपये पंतप्रधान मोदींनी हस्तांतरित केले.
याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले आहेत. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला आहे.
शिमल्यात आयोजित ‘गरीब कल्याण संमेलन’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. वर्षभर चालणाऱ्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पीएम किसान योजनेंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले आहेत, मात्र एखादा शेतकरी असेल ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर ते हेल्पलाइनची मदत घेऊ शकतात. ही सरकारी हेल्पलाइन केवळ पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित समस्यांसाठी तयार करण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेचे हेल्पलाइन क्रमांक
पंतप्रधान किसान योजना टोल फ्री क्रमांक: ०११-२४३००६०६,
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१
पीएम किसान योजना ईमेल आयडी: ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
कार्यक्रमात काय म्हणाले पीएम मोदी?
शिमल्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “पंतप्रधान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देशातील 10 कोटींहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आला.
सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप अभिनंदन. 100% लाभ, 100% लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. लाभार्थ्यांच्या संपृक्ततेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.
शत-प्रतिशत सक्षमीकरण म्हणजे भेदभाव संपवणे, शिफारशी संपवणे, तुष्टीकरण संपवणे, प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ दिला गेला.भ्रष्टाचाराची व्याप्ती कमी झाली. आज जन धन खाते, जन धन-आधार आणि मोबाईल वरून बनवलेल्या त्रिशक्तीचे फायदे यावर चर्चा होत आहे.