PM Kisan Yojana : प्रतीक्षा संपली! खात्यात उद्या जमा होणार 2000 रुपये, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ? जाणून घ्या

PM Kisan Yojana : शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) पीएम किसान योजनेअंतर्गत (Kisan Yojana) लाभार्थी शेतकर्‍यांना 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने हप्त्यांद्वारे दिली जाते.

अनेक दिवसांपासून शेतकरी 12 व्या हप्त्याची (12th installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. किसान सन्मान निधी योजनेचा (Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता उद्या जारी होणार आहे.

17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 11:30 वाजता नवी दिल्ली येथे “पीएम किसान सन्मान 2022” (PM Kisan Samman 2022) चे उद्घाटन करतील. या परिषदेदरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी केला जाईल.

पीएम किसान संमेलन 2022 कार्यक्रमात 1 कोटींहून अधिक शेतकरी सहभागी होतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेत त्यांचे ई-केवायसी केलेले नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

भारत सरकारने ई-केवायसीसाठी 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, ही मुदत आता संपली आहे. त्याच वेळी, OTP आधारित ई-केवायसी अजूनही पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करताना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत चुकीची माहिती टाकली होती. त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. हप्त्याचे पैसे हस्तांतरित केल्यानंतर, तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमची स्थिती सहज तपासू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts