अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 PM Modi : आपल्या देशात शेकडो कायदे होते जे नागरिकांसाठी ओझं बनले होते. पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्या ५ वर्षात मी १५०० कायदे रद्द केले.
आपल्या व्यवस्थेत, नियमांमध्ये आणि पंरपरांमध्ये बदल करण्यासाठी ३० ते ४० वर्ष लागत होते. मात्र, आजच्या वेगान बदलणाऱ्या जगात आपल्याला प्रत्येक क्षणाचा क्षणाचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नागरी सेवा दिवसानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मोदी म्हणाले, आपण एका लोकशाही राज्यव्यवस्थेत आहोत. आपण आपल्यासमोर तीन उद्दिष्ठ ठेवली पाहिजेत. पहिलं उद्दिष्ठ देशातील सामान्य माणसाच्या जीवनात बदल आणि बदलाची जाणीव त्यांना जाणीव होणं हे आहे, असं मोदी म्हणाले.
दुसरं उद्दिष्ठ म्हणजे आपण भारतात जे काही करु ते जागतिक संदर्भात करायला पाहिजे. तिसरं म्हणजे व्यवस्थेत आपण कुठेही असो, ज्या व्यवस्थेतून आलो आहोत.
त्यामध्ये आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी आहे. आपल्याला आगामी २५ वर्षांच्या विकासाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे.
२०४७ मध्ये आपला जिल्हा प्रगतीच्या दृष्टीनं कुठं असावा हे निश्चित करुन त्यादृष्टीनं काम करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.