PM Mudra Yojana : केंद्र सरकार (Central Govt) जनतेच्या हितासाठी सतत नवनवीन योजना आणत असते. यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) आहे.
तुम्ही जर तुमचा स्वतःचा व्यवसाय (Business) सुरु करणार असाल तर केंद्र सरकार तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे हमीशिवाय कर्ज देत आहे. सरकार हे कर्ज (Loan) व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर देते.
मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. योजनेअंतर्गत लाभार्थीला मुद्रा कार्ड (Mudra Card) मिळते. डेबिट कार्डप्रमाणेच मुद्रा कार्डचा वापर केला जातो.
या कार्डच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित खर्चासाठी पैसे घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून सरकारला देशात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचे आहे.
या योजनेअंतर्गत, जर एखादी व्यक्ती लहान व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल. अशा परिस्थितीत त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची सुविधा केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कामांसाठी दिली जाते. याशिवाय जे थकबाकीदार आहेत, त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल.
या प्रकरणात, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा पत्ता, स्थापनेचा पुरावा, मागील तीन वर्षांचा ताळेबंद, आयकर रिटर्न, सेल्फ टॅक्स रिटर्न आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. तुम्ही मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mudra.org.in/ ला भेट देऊन या योजनेत सहज अर्ज करू शकता.