PM Pension : प्रत्येकजणाला भविष्यातील (Future) पैशांची काळजी सतावत असते. त्यामुळे अनेकजण गुंतवणुकीचा (Investment) पर्याय निवडतात.
अशातच सरकारने प्रधानमंत्री वय वंदना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पती आणि पत्नीला महिन्याला 18500 रुपये मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा (Social security) देण्यासाठी ही प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू करण्यात आली आहे. एलआयसी (LIC) ही पेन्शन योजना सरकारसाठी (Govt) चालवत आहे. यापूर्वी गुंतवणुकीची मर्यादा 7.50 लाख रुपये होती मात्र आता ती 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
इतके व्याज मिळत आहे
प्रधानमंत्री वय वंदना योजनेत वार्षिक 7.4 टक्के व्याज (Interest) मिळते. आता 60 वर्षांवरील व्यक्ती यामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.
पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर पती-पत्नी दोघांनी वयाच्या 60 व्या वर्षी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांना 18,300 रुपये पेन्शन मिळेल.
ही पीएम पेन्शन योजना आहे
60 वर्षांवरील सर्व नागरिक 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक 31 मार्च 2023 पूर्वी करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीनुसार दरमहा 1000 रुपयांपासून 9250 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.
जर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत किमान 1.50 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक मिळेल.
15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीने गुंतवणूक केली तर तुम्हाला 30 लाख रुपये गुंतवावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 18,500 रुपये मिळतील.
तुम्ही या प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी येथून अर्ज करू शकता
तुम्हाला 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने आणि प्रत्येक महिन्यासाठी पेन्शन मिळू शकते. तुम्ही कोणती योजना घेतली आहे यावर ते अवलंबून आहे. या योजनेचा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे लाभ घेता येईल.
एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्ही एलआयसी शाखेला भेट देऊन ऑफलाइन देखील अर्ज करू शकता. ही योजना 10 वर्षांसाठी आहे. यादरम्यान पेन्शन पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला प्रधान मंत्री वय वंदना योजनेची मूळ रक्कम मिळते.