ताज्या बातम्या

PMJDY : भारीच.. आता खात्यात पैसे नसतील तरीही काढता येणार पैसे, कसे ते जाणून घ्या

PMJDY : सर्वसामान्य जनतेसाठी राज्य आणि केंद्र सरकार सतत वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. अशीच एक योजना केंद्र सरकारकडून 2014 मध्ये सुरु केली होती जिचे नाव जन धन योजना असे आहे. त्यामुळे ग्राहक खाते शून्य शिल्लकवर खाते उघडू शकतात.

यातून उघडून तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडली गेली आहेत. दरम्यान काय आहे ही योजना? कोणाकोणाला याचा लाभ घेता येतो? जाणून घेऊयात.

काय असते ओव्हरड्राफ्ट सुविधा?

ओव्हरड्राफ्ट ही एक प्रकारची कर्ज सुविधा असल्याने सुविधेमुळे ग्राहक त्यांच्या खात्यात कमी शिल्लक असली तरी त्यांना जास्त पैसे काढता येतात. यात काढण्यात आलेली रक्कम ठराविक वेळेत परत करणे गरजेचे असते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काढलेल्या रकमेवर व्याज आकारण्यात येत नाही. तुम्हाला ही रक्कम तुम्ही ATM किंवा UPI द्वारे काढता येते.

जाणून घ्या महत्त्वाच्या अटी

जर तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे खाते 6 महिने जुने असणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येतो. नाहीतर तुम्हाला कवळ 2,000 रुपये मिळतील.

फायदे

याचा एक फायदा म्हणजे तुमच्याकडे शून्य शिल्लक असेल तर तुम्ही ते सुरू ठेवू शकता. म्हणजेच अर्थ असा की जर तुमच्या खात्यात शून्य शिल्लक असल्यास तुम्हाला एक रुपयाही शुल्क भरावे लागत नाही.

जर तुम्हाला हे खाते सुरु करायचे असेल तर तुम्हाला देशातील कोणत्याही सरकारी आणि गैर-सरकारी बँकेत उघडता येते. सामान्य खात्यांप्रमाणे, तुम्हाला जन धन खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्यात येते.

जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते चालू केलं तर तुम्हाला रुपे एटीएम कार्डची सुविधा दिली जाते. तसेच यात 2 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचे लाईफ कव्हर उपलब्ध आहे.

या लोकांना घेता येतो लाभ

देशातील कोणताही नागरिक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर बँकेत खाते उघडू शकतो. प्रत्येकाला बँकिंग क्षेत्राशी जोडणे हा या योजनेचा उद्देश असून हे खाते तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर सर्व वैयक्तिक तपशील भरावे लागणार आहेत. तसेच जर तुमचे कोणतेही बचत खाते असल्यास तुम्ही ते खाजगी खात्यात ट्रान्सफर करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts