ताज्या बातम्या

PMKSN: शेतकऱ्यांनो तयार रहा! या दिवशी येतोय १२वा हफ्ता; संपूर्ण डिटेल्स पहा

PMKSN : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देत आहे. आत्तापर्यंत ११ हाफे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank account) जमा झाले असून आता १२ व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

त्यामुळे आता शेतकरी 2,000 रुपयांच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या या योजनेचा 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येईल, असे मानले जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपणार आहे. कोरोना (Corona) संसर्गाच्या साथीच्या काळापासून केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करत असून, त्याचाही मोठा परिणाम होत आहे.

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे, ते त्यांच्या पिकांना खते आणि बियाणे देऊ शकतील, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारने अद्याप हप्ता पाठवण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु सर्व बातम्यांमध्ये असे बोलले जात आहे.

वर्षाला इतके हजार रुपये मिळतात

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये लोकांच्या खात्यात हस्तांतरित करते. 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

पहिला हप्ता दरवर्षी १ एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा १ ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत जमा केला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ मे रोजी पहिला हप्ता (११ वा हप्ता) आला आहे. यापूर्वी १ जानेवारी २०२२ रोजी मागील वर्षाचा शेवटचा हप्ता खात्यावर पाठविण्यात आला होता.

शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे की सरकारने ई-केवायसी (E-KYC by Govt) करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. त्याच वेळी, सूत्रांनी असेही म्हटले आहे की 31 जुलैनंतर ई-केवायसीची तारीख वाढविली जाणार नाही.

अशा परिस्थितीत, ज्यांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी केले आहे त्यांनाच भविष्यात पीएम किसान निधीचा लाभ मिळू शकेल. तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts