अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत.
दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल पकडली.
या मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना या गाडीचा संशय आला. त्यांनी अक्षय गाडेकर यास तू गाडी कोणाकडून खरेदी केली याची माहिती घेतली.
अक्षय गाडेकर याने मोटारसायकल घेणार्याची नावे सांगितली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पोलीस पथकाला तपासाचे आदेश दिले.
शहर पोलीस पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर महादेव देवकर रा. नेवासा, नल्ल्या उर्फ आकाश अनिल गायकवाड रा. नेवासा यांना अटक केली. पोलीस पथकाने आरोपींकडून होन्डा शाईन कंपनीचे 3 मोटारसायकल,
एक हिरो एच.एफ. डिलक्स, एक होन्डा अॅक्टीवा असे एकूण 5 मोटारसायकल (एकूण किम्मत 3,50,000रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे. सदर मोटार सायकल पुणे, नाशिक अहमदनगर औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.