अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या ‘त्या’ मुलाला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर एका अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

बेलापुर येथील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातून निघुन गेली होती या बाबत बेलापुर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता मुलीचा लवकरात लवकर तपास लावावा यासाठी अनेक आंदोलन पार पडले.

२३जुलै रोजी सैराट झालेले ते दोघे तब्बल एक महीन्यानंतर धुळे येथे असल्याची खबर पोलीसांना मिळाली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, हवालदार अतुल लोटके,

पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे धुळे जिल्ह्यात पोहोचले धुळे जिल्ह्यातील पाळधी या गावी अल्पवयीन मुलीसह तो मुलगा असल्याची पक्की खबर पोलीसांना मिळाली.

वेषांतर करुन मिळालेल्या ठिकाणावर पोलीस पोहोचले परंतु पोलीस पोहोचण्या आधीच तो मुलगा फरार झाला होता. पोलीसांनी पुन्हा त्याच ठिकाणी सापळा लावला दुसऱ्या दिवशी ‘त्या’-मुलाला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले.

अल्पवयीन मुलगी व त्या मुलाला ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरच्या दिशेने रवाना झाली आहेत एक महीन्याच्या प्रयत्नानंतर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts