अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यामधे दारूविरोधी कारवायात पोलिसांनी आता दंड थोपाडले आहेत.अवैध दारूविक्रीसह जुगार अड्यावर पोलिसांनी ठिकठिकाणी धडक कारवाया सुरू केल्या आहेत.
शनिवारी सकाळी राहुरी शहरातील शनी चौकात अवैध दारू विक्री करणा-या करणा-या ठिकाणी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या सह पोकाॅ. अजिनाथ पाखरे,पोकाॅ.सचिन ताजने,
पोका.लक्ष्मण बोडखे आदिंच्या पोलिस पथकाने या ठिकाणी छापा टाकत ५,७६० रूपायांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आरोपी शैलेंद्र भास्कर गुज्जर यांस पोलिसांनी ताब्यात घेतल त्याच्यावर गुन्हा दाखल करूण कारवाई केली आहे.