अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- पोलिसांकडून अवैध धंद्यांवर सध्या कारवायांचे सत्र सुरु करण्यात आले आहे. यातच पोलिसांनी नुकतेच नेप्ती शिवारात तीन ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी पोलिसांनी साकत शिवारातील सिना नदीपात्रात चार ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी हातभट्टी चालविणार्या दोन महिलांसह चौघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुष्पा अर्जुन पवार (वय 36), मथुरा नारायण पवार (वय 45), महिपती माधव पवार (वय 55), राजू मौला पवार (सर्व रा. साकत ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तिघांना ताब्यात घेण्यात आले असून राजू पवार पसार झाला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमध्ये 27 हजारांची 270 लीटर दारू व एक लाख 32 हजार रूपयांचे दोन हजार 200 लीटर रसायन असा एक लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे..