पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण नडले, शिवसेना नेते संजय राठोड यांचा अखेर राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती.

रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून विरोधक आक्रमक झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts