अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- पॉर्नोग्राफी प्रकरणातअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासूनच अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची नावं चर्चेत आली आहेत. याच खास करून पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांच्या नावांची अधिक चर्चा आहे.
कारण राज कुंद्रासोबत पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राने करार केला होता. दोघींनी देखील राज कुंद्रासाठी काम केलं आहे. यानंतर आता सोशल मीडियावर पूनम पांडेचा एका व्हिडीओ व्हायरल होवू लागलाय. या व्हिडीओत पूनमने न्यूडिटीवर तिचं मत मांडलं आहे.
राज कुंद्रा प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसह अनेकांनी राज कुंद्राचे अॅपवरील फिल्म या पॉर्नोग्राफी नसून इरोटिका म्हणजेच न्यूडिटीच्या श्रेणीत येत असल्याचं म्हंटलं आहे. याबद्दलच आता पूनम पांडेने खुलासा केलाय. या व्हिडीओत पूनमने काही उदाहरणं देत न्यूडिटी म्हणजे एक कला असल्याचं म्हंटलं आहे.
याबद्दलच आता पूनम पांडेने खुलासा केलाय. या व्हिडीओत पूनमने काही उदाहरणं देत न्यूडिटी म्हणजे एक कला असल्याचं म्हंटलं आहे. पॉर्नोग्राफी आणि न्यूडिटीमध्ये फरक असल्याचं पूनम म्हणाली आहे. ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी मला फोन आणि मेसेज करून पॉर्नोग्राफी आणि इरॉटिकातील फरक स्पष्ट करण्यास सांगितलं.
मला एवढं ज्ञान नसलं तरी मला न्यूडिटीचा अर्थ माहित आहे. कारण मी न्यूड फोटोशूट केले आहेत. आपण एखाद्या पुस्तकाच्या दुकानातून कामसूत्र पुस्तक विकत घेऊ शकतो. ७० च्या दशकात लोकप्रिय चित्रकार एम एफ हुसैन यांनी अनेक न्यूड चित्र काढली आहेत. न्यूडिटीकडे कला म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.” असं पूनम म्हणाली.