ताज्या बातम्या

Post Office: पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! ‘त्या’ नियमात झाला मोठा बदल ; आता ..

Post Office: तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. पोस्ट ऑफिसने निर्णय घेत एक मोठा नियम बदलला आहे. पोस्ट ऑफिसने थेट पैसे काढण्याच्या नियमात बदल केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे अशी माहिती पोस्ट ऑफिसने दिली आहे .

पोस्ट ऑफिसने दिली माहिती

पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एका महिन्यात मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये + GST ​​शुल्क भरावे लागेल. इतकेच नाही तर मिनी स्टेटमेंटसाठी प्रति व्यवहार 5 रुपये द्यावे लागतील. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे

पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) वरून व्यवहार शुल्क बदलले आहे. एका अधिसूचनेनुसार, हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, जे IPPB चे ग्राहक नाहीत त्यांना 1 पेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आधारद्वारे पैसे काढणे, जमा करणे किंवा मिनी स्टेटमेंट तयार करणे देखील समाविष्ट आहे.

NPCI काय म्हणते ते जाणून घ्या

हे लक्षात घेण्यासारखे आहे की NPCI च्या मते, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्स वापरून फायदे मिळवण्यासाठी AePS वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. AePS एखाद्या व्यक्तीच्या डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक/आयरिस माहितीवर कार्य करते, अशा प्रकारे फसवणुकीचे धोके दूर करते. अशा प्रकारे, AePS ग्राहकांना अधिक सुरक्षा प्रदान करते.

हे पण वाचा :-  Instagram Earn Money : घरबसल्या इंस्टाग्राम देत आहे पैसे कमविण्याची संधी ! फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts