Post Office : करा फक्त 50 रुपयांची गुंतवणूक! मिळेल 35 लाखांचा शानदार परतावा, कसे ते पहा

Post Office : पोस्ट ऑफिस सध्या अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. ज्याचा कोट्यवधी लोकांना चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन अनेक गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवत आहेत. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे गुंतवत असतात.

खरंतर पोस्ट ऑफिसमध्ये पैशांची गुंतवणूक करणे जोखीममुक्त मानले जाते. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित आणि उत्तम परतावा असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवायचे असतात. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना आहे. ज्यात तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा शानदार परतावा मिळवू शकता.

सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत. सर्वात अगोदर प्रथम पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे खाते उघडावे लागणार आहे, समजा तुम्ही ही संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. सरकारकडून ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

ग्रामसुरक्षा योजना

केंद्र सरकारतर्फे राबविली जात असणारी ग्राम सुरक्षा योजना सर्वांची मने जिंकत आहे. यात तुम्हाला सर्वात अगोदर खाते उघडावे लागणार आहे, त्यानंतर गुंतवणूक प्रक्रिया सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत सहज गुंतवणूक करू शकता. यात तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा.

हे लक्षात घ्या की या योजनेची खास गोष्ट म्हणजे 4 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकेल. वयाच्या 19 व्या वर्षी योजनेसाठी अर्ज करून, तुम्हाला 10 लाख रुपयांची योजना खरेदी करता येईल. यात तुम्हाला दररोज 50 रुपये तर मासिक 1515 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. तुम्हाला ही गुंतवणूक 55 वर्षांसाठी दर महिन्याला करावी लागणार आहे.

मिळेल चांगला परतावा

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत वयाच्या 55 ​​वर्षापर्यंत मासिक आधारावर गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही वयाची 80 वर्षे पूर्ण करता त्यावेळी मोठा निधी तयार होईल. या योजनेच्या मुदतपूर्तीवर, तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतचे एकरकमी उत्पन्न मिळेल. योजनेत तुम्हाला बोनस सुविधा मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts