Post Office : प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस शानदार योजना आणत असते. कारण पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये लोकांना आता भरपूर प्रमाणात पैसे मिळतात. त्याचा त्यांना प्रचंड फायदा होत आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
इतकेच नाही तर गुंतवणूकदारांना या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. अशातच आता पोस्ट ऑफिस धारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता 10,000 गुंतवून मजबूत परतावा मिळणार आहे. कसे ते जाणून घ्या.
काय आहे पोस्ट ऑफिस आरडी बचत योजना?
पोस्ट ऑफिसची आरडी ही बचत योजना असून या योजनेत तुम्ही कमी गुंतवणूक करून लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेत 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता, म्हणजेच यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला यात प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्हाला परिपक्वतेवर मजबूत परतावा देण्यात येत आहे. यात तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला 5 वर्षांनंतरही गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही ती 10 वर्षांसाठी देखील करू शकता.
किती व्याज मिळते?
पोस्ट ऑफिस RD वर तुम्हाला तिमाहीसाठी 5.8 टक्के पर्यंत व्याज दिले जात आहे.
तुमच्या गुंतवणुकीवर मिळतील 16 लाख रुपये
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 10,000 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. 10 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 5.8 टक्के व्याजदरानुसार 16 लाख 28 हजार 963 रुपये दिले जातील.
उपलब्ध आहे आगाऊ ठेव सुविधा
आता पोस्ट ऑफिस आरडीमध्ये आगाऊ ठेव सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही एकाच आता वेळी 12 महिन्यांसाठी पैसे जमा करू शकता.