ताज्या बातम्या

Post Office Scheme Benefits : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत होणार बंपर कमाई ! फक्त करावी लागणार हजार रुपयांची गुंतवणूक ; वाचा सविस्तर

Post Office Scheme Benefits : भविष्याच्या गरजापूर्ण करण्यासाठी आज लोक अनेक प्रकारे गुतंवणूक करत आहे. आपल्या देशात आज पोस्ट ऑफिसमध्ये देखील अनेकजण मोठी गुंतवणूक करून मोठी कमाई करत आहे.

तुम्ही देखील नवीन वर्षात पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या लाभ घेऊन तुम्ही मोठी कमाई देखील करू शकतात. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट (TD) योजनेबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही या योजेनमध्ये गुंतणवूक करून मोठी कमाई करू शकतात चला तर जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणजे काय 

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर असतात. यामध्ये गुंतवणुकदाराला चक्रवाढीचा लाभही मिळतो. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेला टाइम डिपॉझिट म्हणतात. यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीची सुविधा मिळते. त्यांचे व्याज देखील कालावधीनुसार बदलते. सध्या 1 वर्षाच्या ठेवीवर 5.5%. दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.7%. तीन वर्षांच्या ठेवींवर 5.8%. 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7% दराने व्याज दिले जात आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटची वैशिष्ट्ये  

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट संयुक्त खाते उघडण्याची सुविधा देखील दिली जाते. संयुक्त खात्यात 3 प्रौढ असू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किमान 1000 रुपये जमा करून खाते उघडू शकता. यामध्ये जास्तीत जास्त पैसे जमा करण्याची मर्यादा नाही. त्याच पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 5 वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. सुरक्षा म्हणून खाते ठेवून तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. एवढेच नाही तर एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाती ट्रान्सफरही करता येतात.

पैसा असा दुप्पट होईल

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीमध्ये एकूण 39,407 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 1,39,407 रुपये मिळतील. दुसरीकडे, जर तुम्ही ते 3 वर्षांसाठी निश्चित केले तर तुम्हाला 5.8 टक्के व्याजावर 1,18,857 रुपये, दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर 1,11,985 रुपये आणि एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 1,05,614 रुपये मिळतील.

हे पण वाचा :- Central Government : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत होत आहे तब्बल 5 लाखांचा फायदा ! असा करा अर्ज ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts