Post Office Scheme : पोस्टाची दमदार स्कीम! एकदाच गुंतवणूक करून मिळवा दरमहा जबरदस्त परतावा

Post Office Scheme : समजा तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला चांगले पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिसची योजना असल्याने तुमचे पैसे सुरक्षित देखील राहतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे समजून घ्या की पोस्टाच्या या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे आणि तुम्हाला तो आणखी 5-5 वर्षासाठी वाढवू शकता. तुम्हाला या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. जाणून घ्या सविस्तर योजनेबद्दल माहिती.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना

हे लक्षात घ्या की, पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना आपल्या गुंतवणूकदारांना हमी उत्पन्न देते. यात तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येईल, हे लक्षात घ्या. पोस्टाच्या या योजनेत वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज देण्यात येते, ते तिमाही आधारावर मिळते.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना कॅल्क्युलेटरवर आधारित, जर तुम्ही 5 लाख रुपये एकत्र गुंतवले तर, तुम्हाला मासिक 3,083 रुपयांची रक्कम मिळेल. एकंदरीतच तुम्हाला एका वर्षात 36,996 रुपयांची रक्कम मिळेल. तुम्ही संयुक्त खाते चालू केले, तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये एकत्र जमा करता येईल.

जाणून घ्या नियम

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसची परिपक्वता 5 वर्षे आहे. परंतु ते तुम्हाला वेळेपूर्वी बंद करता येऊ शकते. तसेच, तुम्ही ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकता. नियमानुसार 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढायला गेला तर जमा केलेल्या रकमेपैकी 2 टक्के रक्कम कापून परत करण्यात येते. तुम्ही खाते उघडल्यानंतर ३ वर्षांनी मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर, तुमच्या ठेवीची रक्कम १ टक्के वजा केल्यावर परत करण्यात येते.

जाणून घ्या पोस्टाच्या या शानदार योजनेची वैशिष्ट्ये

आनंदाची बाब म्हणजे पोस्ट ऑफिस एमआयएस खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते. 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ते वाढवता येईल. इतकेच नाही तर या खात्यात तुम्हाला नॉमिनीची सुविधा मिळते. यात 2 ते 3 लोक एकत्र खाते चालू करता येते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts