ताज्या बातम्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ भन्नाट योजनेचा त्वरित घ्या लाभ ! पीएम मोदीही करत आहे गुंतवणूक ; जाणून घ्या फायदे

Post Office Scheme:   तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस (post office) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहे.

त्यांनी जीवन विमा (Life Insurance) आणि नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये (National Savings Certificate) मोठी गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये त्यांनी NSC मध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपये गुंतवले आहेत. त्यांनी आयुर्विम्यात 1 लाख 50 हजार 957 रुपयांचा प्रीमियम जमा केला.

National Savings Certificate (NSC)

जर तुम्हाला शून्य जोखमीवर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेचा हा एक भाग आहे.

गुंतवणूक कशी करू शकतात ?

नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये किमान लॉक-इन कालावधी 5 वर्षे आहे. अशाप्रकारे पाहिल्यास 5 वर्षानंतरच तुम्ही त्यात गुंतवलेले पैसे काढू शकाल. एनएससीमध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते .

पहिला एकल प्रकार

तुम्ही यामध्ये स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता.

दुसरा जॉइंट ए प्रकार

यामध्ये दोन लोक एकाच वेळी गुंतवणूक करू शकतात.

तिसरा जॉइंट बी प्रकार

यामध्ये दोन लोक गुंतवणूक करतात, परंतु मॅच्युरिटीवर फक्त एका गुंतवणूकदाराला पैसे मिळतात.

किती गुंतवणूक करता येईल

या योजनेत कोणीही किमान रु 1,000 ची गुंतवणूक करू शकतो आणि 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. यामध्ये 6.8 टक्के व्याजदराने व्याज मिळते.

आयकर सवलतही मिळेल

NSC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट दिली जाते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts