ताज्या बातम्या

Post Office Scheme : होणार बंपर कमाई ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये मिळतो बँकेपेक्षा जास्त पैसा ; पहा नवीन व्याज दर

Post Office Scheme : येणाऱ्या काळातील आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी तुम्ही देखील सरकारच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सध्या पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या काही भन्नाट योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठया प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या भविष्यच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या पोस्ट फिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये इतर बँकांच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळत आहे.पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, मासिक उत्पन्न योजना, किसान विकास पत्र इत्यादींवर चांगला व्याजदर घेऊ शकतात. दुसरीकडे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर 7.1% आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6% व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे, ज्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

इतका व्याजदर मिळत आहे

एक वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 5.5% वरून 6.6% पर्यंत वाढवला आहे जो SBI मध्ये 5.75% आहे.  दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्सवरील व्याज दर 5.7% वरून 6.8% पर्यंत वाढवला आहे, जो SBI मध्ये 6.75% आहे. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांच्या ठेवीवर 7% चा लाभ दिला जात आहे, ज्याला SBI मध्ये 6.25% व्याज मिळत आहे.

 

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) ठेवींवर आता 8% व्याज मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. त्याच वेळी, 55 वर्षांवरील परंतु 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक जे सेवानिवृत्त झाले आहेत किंवा VRS अंतर्गत सेवानिवृत्त झाले आहेत ते देखील खाते उघडू शकतात. हे देखील लक्षात घ्या की सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत खाते उघडले पाहिजे आणि जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

हे पण वाचा :- Heart Pain: सावध राहा ! ‘या’ कारणांमुळे होते हृदयदुखी ! दुर्लक्ष केल्यास गमवावा लागतो जीव

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts